‘या’ महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त; संशोधनातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर

नवी दिल्ली | महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलीये. महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या हृदयविकाराशीही संबंधित असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

ज्या महिलांना वंध्यत्वाची समस्या आहे, त्यांच्या हृदयाच्या विफलतेची शक्यता इतर महिलांच्या तुलनेत 16 टक्क्यांपर्यंत जास्त असते, असा दावा ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानंतर करण्यात आला आहे.

महिलांच्या पुनरुत्पादनाचा इतिहास त्यांना भविष्यात हृदयविकार होण्याची शक्यता किती आहे हे सांगतं.

जर एखाद्या महिलेला गरोदर असताना समस्या येत असतील किंवा रजोनिवृत्तीच्या काळात समस्यांना सामोरं जावं लागत असेल, तर नंतरच्या काळात तिला हृदयविकाराचा धोका वाढतो, असं अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटलं आहे.

संशोधनादरम्यान हृदयविकाराच्या दोन प्रकारांचा म्हणजेच हार्ट फेल्युअरचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आत्तापर्यंत हे माहीत होते की ज्या महिलांना मुले होण्याची समस्या असते त्यांना उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचा आजार होण्याची शक्यता असते, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो” 

अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे 

…म्हणून लोक भाजपला मतदान करतात- पृथ्वीराज चव्हाण