Top news देश

कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले; 24 तासात वाढले ‘एवढे’ रुग्ण

मुंबई |  दिवसेंदिवस देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच चिंताजनत होत चालली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनायोद्धे जीवाची बाजी लावून लढत आहेत. परंतू आणखी देखील रूग्णांमध्ये प्रत्येक दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांतली देशातली आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाबाधित रूग्णांमध्ये आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ झालेली आहे. शनिवारी 2,644 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. आतापर्यंतचे सर्व रेकोर्ड कोरोनाने मोडित काढले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 83 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात 1301 रूग्ण कोरोनाने दगावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 10 हजार 600 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, लॉकडाऊन असून देखील देशात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळतो आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग वेग नक्कीच रोखला गेला आहे. मात्र त्याला आळा घालण्यात भारताला आणखीही यश आलेलं नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

-निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी, शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

-ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

-…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

-महाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द; लॉकडाऊनमध्ये खातेधारकांची आर्थिक कोंडी

-“कोरोनावर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर औषध भारताने मिळवलं पाहिजे”