Top news

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक कुटूंब नसून ते लिव्ह इन रिलेशनशिप- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे एक दुंभगलेलं कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला कोणताही रस नाही. देशाच्या या इतिहासात महाराष्ट्र अपवाद ठरेल असं वाटत नाही. आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकार लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर स्थापन केलेल्या सरकारला काय म्हणाल? त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तो एक फसलेला प्रयत्न होता. त्यामुळे त्याला कुठलं नाव देता येणार नाही.

दरम्यान, भाजपमध्ये कोणत्याही अंतर्गत कुरूबूरी नाही. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप हा एकसंघ पक्ष असून आमच्यात कोणत्याही प्रकारच्या कुरबूरी नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?

IMPIMP