मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना भरावा लागणार भुर्दंड; महापौरांनी घेतला निर्णय

पुणे | काेरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास मुंबई महापालिकेने  1000 रूपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. आता मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही थुंकोबांना दंड भरावा लागणार आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी रस्त्याबरोबरच आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिका प्राधान्याने कारवाई करत आहे. तसेच पूर्वी घेतली जाणारी दंडाची रक्कम 150 वरून वाढवून 500 रु करण्यात आला आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

कोराना हा संसर्गजन्य आजार असल्याने थुंकीमार्फतही पसरू शकतो. त्याची लागण इतर नागरिकांना होऊ शकते यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला गेल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान,  आपल्याकडे पान, गुटखा आणि सुपारी खावून रस्त्यावर जागोजागी थुंकणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दंड वाढवल्याने आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवू शकतो, अशी महानगरपालिकेची यामागची भूमिका आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर परस्थिती बिघडू शकते- तुकाराम मुंढे

-कोरोना व्हायरसमुळे हस्तांदोलन टाळा, नमस्कार करा; शरद पवारांचा सल्ला

-“हे सरकार रोज कोरोना रुग्ण किती वाढतायत ह्याची माहिती देण्यासाठीच आहे काय?”

-“कंपन्या बंद न ठेवणाऱ्या मालकांना, मॅनेजरला पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा”

-धक्कादायक! इटलीत एका दिवसांत 627 रुग्णांचा मृत्यू