…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनानंतर मनोरंजन विश्वातील कलाकारांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर अद्याप अनेकांचा विश्वास बसत नाही. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सिद्धार्थच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.

अशातच आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून विद्युतने सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

विद्युत आणि सिद्धार्थ दोघे खूप चांगले मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांनी आपली मैत्री उत्तमप्रकारे जपली होती. यामुळे सिद्धार्थविषयी बोलताना व्हिडीओदरम्यान विद्युतला अनेकवेळा अश्रू अनावर झालेले दिसत आहेत.

व्हिडीओची सुरुवात विद्युत एक श्लोक म्हणून करताना दिसत आहे. यानंतर विद्युत सिद्धार्थच्या आठवणी शेअर करताना म्हणतो की, आम्ही दोघे 2004 मध्ये भेटलो होतो. अंधेरी मध्ये एक जिम आहे. सिद्धार्थ या जिममध्ये माझा पहिला पार्टनर होता.

जिममध्ये सिद्धार्थकडे पाहिल्यानंतर मी खूप इम्प्रेस झालो होतो. 15 जुलै रोजी आम्ही शेवटचं भेटलो होतो. मी खूप नशीबवान आहे की सिद्धार्थ माझा मित्र होता. तो त्याच्या जवळच्या लोकांवर अगदी मनापासून प्रेम करायचा, असं म्हणताना विद्युत व्हिडीओमध्ये भावूक होताना दिसत आहे.

तसेच पुढे बोलतना विद्युत म्हणाला की, सिद्धार्थ त्याच्या आईच्या खूप क्लोज होता. मी माझ्या आईवर प्रेम करतो त्यापेक्षा अधिक तो त्याच्या आईवर प्रेम करायाचा. केव्हा केव्हा तर मला त्याचा हेवा वाटायचा.

दरम्यान, विद्युतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओर अनेक लोक प्रतिक्रिया देत सिद्धार्थचा आठवणीत भावूक होत आहेत.

https://www.instagram.com/tv/CTjYv9MJEdt/?utm_source=ig_embed&ig_rid=c8452879-b689-4729-9a97-6345a927e61e

महत्वाच्या बातम्या-

परफेक्ट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर न्यूड होऊन अभिनय केला होता

काय सांगता! भारतीने घटवलं तब्बल 15 किलो वजन, बदल पाहून चाहते आवाक्

संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार आपल्याच एका चाहत्यासोबत लग्न?

पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…

…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी