पुणे | शहरात पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर अशा घोषणा देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडला आहे.
पुण्यातील मुस्लिम समुदायातील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (Popular Front of India) राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात कंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. यात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते.
पीएफआयविरोधात (PFI) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. यावेळी जमावाने अल्लाह हू अकबर आदी घोषणा दिल्या.
मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थानी धाव घेत, आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. पोलिसांनी अनेकांना गाडीत बसविले आणि पोलीस स्थानकात ठेवले.
या घोषणाबाजी प्रकरणात पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे आणि कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमाव केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
मुस्लिम नेत्यांच्या मोहन भागवत भेटीवर असदुद्दीन ओवेसी संतापले; म्हणाले, हे सर्व मुसलमान उच्चभ्रु …
व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलसाठी मोजावे लागणार पैसे; वाचा सविस्तर वृत्त
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा; राज ठाकरे म्हणाले, मैदानाचा वारसा…
अमित शहांची लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांवर मोठी टीका; म्हणाले, लालूजींनी आयुष्यभर…