मुंबई | लग्न म्हटलं की नाच गाण, धमाल, मस्ती ही आलीच. परंतू याही सोबत लग्नामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात. त्यामध्ये नातेवाईकांचे रूसवे फुगवेही पाहायला मिळत असतात.
लग्नामध्ये नवरा-नवरीपेक्षा लग्नामध्ये आलेल्या वऱ्हाड्यांना जास्त मान दिला जातो. त्याचप्रमाणे लग्नामध्ये नवरा-नवरीपेक्षा त्या दोघांच्या कलवरी-कलवऱ्यांचीच खूप मजा असते. तसेच आपल्याला हे माहित असेल की, कोणत्याही मुलीच्या नवऱ्याच आणि तिच्या बहिणीचं म्हणजेच त्या मुलाच्या मेहुणीच नात कसं असतं ते.
असं म्हणतात की, साली आधी घरवाली असते. साली आणि जिजू हे सतत एकमेकांसोबत मस्करी करत असतात. काही-काही साली आणि जिजूमध्ये मैत्रीच नात असल्यासारखं वाटतं.यालाच साजेसा म्हणजेच मेहुणी आणि मेहुणा यांच्यामधील नात दर्शवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय याआधी तुम्ही याआधी अशाप्रकारचा व्हिडीओ पाहिला आहे का. नसेल पाहिला तर आता पाहू शकता. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचं समजतं आहे. या व्हिडीओमध्ये एक मेहुणी आपल्या बहिणीच्या नवऱ्याची म्हणजेच जिजूंची चांगलीच भर लग्न मंडपामध्ये टांग खेचताना दिसत आहे.
लग्नामध्ये नवरदेव आपली बारात घेऊन लग्न मंडपाजवळ येतो. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचे औक्षण करण्यासाठी काही महिला पुढे येतात. त्यामधील एक तरूण मुलगी त्याचं औक्षण करते. ती मुलगी त्या नवदेवाची मेहुणी असल्याचं बोललं जात आहे.
ओवाळून झाल्यानंतर ती त्या नवरदेवाला पेढे खाऊ घालायाला जातो. तोंडपाशी पेढा घेऊन जाते आणि नवरदेव इतक्या आपलं तोंड पेढा खाण्यासाठी उघतो. तेवढ्यातच ती मुलगी आपला हात मागे घेते आणि तो पेढा स्वत:च आपल्या तोंडात टाकते. हे पाहून नवरदेवाचा चांगलाच पोपट झाल असल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऐटीत मासे पकडायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ
‘आता तो माझ्या आसपास नाही परंतु…’; ‘त्याच्या’ आठवणीत मलायकाला अश्रू अनावर
ट्विंकलने पोस्ट शेअर केली अन् राखी भावूक झाली, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
…म्हणून करीनाला सैफकडून नव्हे तर ‘अशा’ पद्धतीने मूल हवं होतं
सायरा बानोंची तब्येत खालावली, आयसीयुमध्ये उपचार सुरू