सुशांत प्रकरणी हृतिक रोशनच्या आईनं मौन सोडलं! सुशांतबद्दल संभ्रमात टाकणारी पोस्ट करत म्हणाल्या…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीसह महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील अनेक आ.रोप करण्यात आले होते. सुशांत प्रकरणी बॉलीवूड इंडस्ट्रीसह महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी अनेकांनी सुरुवातीपासूनच धक्कादायक खुलासे केले आहेत.

अशातच आता अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी सुशांत प्रकरणी मौन सोडत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत पिंकी रोशन यांनी सुशांत सिंह राजपूतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. प्रत्येकाला सत्य जाणून घ्यायचं आहे मात्र प्रामाणिकपणे कोणालाच बोलायचं नाही, असा कॅप्शन पिंकी रोशन यांनी या फोटोसोबत दिला आहे.

पिंकी रोशन यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा सुशांत प्रकरणी खळबळ उडवली आहे. पिंकी यांचा इशारा कोणाकडे आहे? सुशांत प्रकरणी सत्य कोण लपवत आहे?, असे प्रश्न सुशांतच्या चाहत्यांना पडले आहेत.

पिंकी रोशन या एकीकडे सुशांत प्रकरणी न्यायाबद्दल बोलत आहेत तर दुसरीकडे प्रश्नही उपस्थित करत आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे सुशांत प्रकरणी अनेकांना संभ्रमात टाकलं आहे.

दरम्यान , सुशांत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला होता. मात्र, आता अखेर सुशांत प्रकरणातील गुंता सुटताना दिसत आहे. सुशांतच्या मृ.त्युप्रकरणी शोध घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीमसुद्धा सीबीआयला मदत करत होती. एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं अखेर सुशांत प्रकरणाचे मेडिकल अहवाल सीबीआयकडे सोपविले आहेत.

सुशांतच्या सर्व फॉ.रेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे. यानुसार सीबीआयनंही सुशांत सिंह राजपूतनं आ.त्मह.त्याच केली होती, असं स्पष्ट केलं आहे.

सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सीबीआय सध्या सुशांतच्या आ.त्मह.त्येच्या बाजूने तपास करत आहे. मात्र, सीबीआयच्या तपासात अशी कोणतीही गोष्ट आढळली नाही की ज्याच्यावरून सुशांतनं रिया चक्रवर्तीमुळे आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट होईल.

तसेच रिया चक्रवर्तीनं सुशांतचे पैसे खर्च केल्याचं बोललं जात होतं. मात्र, गेल्या पाच वर्षांत 70 कोटी रुपयांतील 55 लाख रुपये सुशांतनं रियासाठी खर्च केल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे. परंतु हे पैसे केवळ ट्रिप्स, स्पा आणि गिफ्ट्स यासाठी वापरण्यात आले होते. यामुळे सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीवर करण्यात आलेले अनेक आरोप सीबीआयनं फेटाळले आहेत.

 

View this post on Instagram

 

#prayersarepowerful #universeispowerful🌍

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on

महत्त्वाच्या बातम्या-