मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह अनेकांना एनसीबीनं याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत. अशातच आता शौविकनं आपल्या गु.न्ह्याची कबुली देत महत्वाची माहिती दिली आहे.
सुशांत सिंह राजपूतला ड्र.ग्ज कोण पोहोचवत होतं? ड्र.ग्जसाठी पैसे कोण देत होतं? सुशांतनं अलीकडच्या काळात केव्हा ड्र.ग्ज आणले होते?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शौविकनं एनसीबीच्या चौकशी दरम्यान दिली आहेत.
2020 मध्ये मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात सुशांतला ड्र.ग्ज आणून दिल्याची कबुली शौविकनं दिली आहे. 16 मार्च 2020 रोजी सुशांतनं शौविकला ड्र.ग्ज आणण्यास सांगितले होते. सुशांतनं ड्र.ग्ज आणण्यास सांगितल्यानंतर रियानं व्हाॅट्सअॅपवरून किती ड्र.ग्ज आणायचे याची माहिती शौविकला दिली होती.
रिया आणि सुशांतकडून कोणते ड्र.ग्ज किती आणायचे याची माहिती मिळाल्यानंतर शौविकनं बासितशी संपर्क साधला. बसितला ड्र.ग्जविषयी संपूर्ण माहिती दिली. शौविकनं सॅम्युअलला बासितचा नंबर दिला. यानंतर बासितच्या माध्यमातून सॅम्युअलचं बोलणं विलात्राशी झालं. अखेर 17 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता झैदनं बांद्रामध्ये सॅम्युअलजवळ ड्र.ग्ज आणून दिले, असं शौविकनं सांगितलं आहे.
तसेच सुशांत अं.मली पदार्थांच्या खूप आहारी गेला होता. लॉकडाऊनमध्ये ड्र.ग्ज न मिळाल्यानं तो खूप बेचैन झाला होता, असंही शौविकनं म्हटलं आहे.
दरम्यान, न्यायालयानं शौविक चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्तीसह इतर 4 जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयानं रियाला 14 दिवसांची को.ठडी सुनावली आहे. रियाचे वकील सतीश माने शिंदे उच्च न्यायालयात रियाचा जा.मीन अर्ज करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या फार्महाऊसवर रियापूर्वी ‘ही’ अभिनेत्री येत होती
सुशांतच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा! सुशांतनं मृ.त्युच्या एक दिवस अगोदर केली होती ‘ही’ गोष्ट
ऐकावं ते नवलंच! कुत्र्यांमध्ये भांडण झाल्यानं ‘या’ अभिनेत्यानं पत्नीला दिला घटस्फोट
धक्कादायक! रिया आणि सुशांतनं ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून ‘ही’ गोष्ट केली होती
झोपडीत राहात होती मुलगी, पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC परीक्षा!