‘मी वाचवू शकलो नाही’ म्हणत त्याने लेकीचा जळालेला पाय पोलिसांकडे नेला; काळीज पिळवटून टाकणारी घटना

मुंबई | मुलीचं लग्न म्हटलं की खर्च हा आलाच. लग्नाचा खर्च भागवण्यासाठी मग कर्ज काढून विवाह उरकण्यात येतो. तर, अजूनही काही भागात मुलीकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. याच हुंड्यामुळे बिहारमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

बिहारमध्ये हुंड्यासाठी मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीला जाळण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. ही घटना बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्याच्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

हुंड्याची मागणी मी पूर्ण करण्यास नकार दिला, म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी तिला जाळलं (Burn Alive), असा आरोप या मुलीच्या वडिलांनी केलाय.

या मुलीच्या पायात असलेल्या पैंजणांवरुन तिच्या बापानं तिची ओळख पटवली. तिचा कापला गेलेला पाय बापानं पिशवीत भरला आणि थेट पोलीस स्थानक गाठलं होतं.

अखिलेश बिंद असं या बापाचं नाव आहे. त्यांनी 2021 साली मुलगी ममता हीचं लग्न लावलं होतं. गेल्या वर्षी मे महिन्यात तिचं लग्न झालं. शत्रुघ्न बिंद हिच्याशी ममताचं लग्न लावून देण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील” 

“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या मनात काय हे कळणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”