मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर मोठी कारवाई

मुंबई | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा टेलिग्राफ कायद्यांतर्गत नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश देण्यात आले आहेत. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान रश्मी शुक्ला यांनी राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्ला हे एसआयडीचे प्रमुख असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे फोन टॅप केले. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 166 आणि टेलिग्राफिक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असं माहिती समोर आलीये.

रश्मी शुक्ला आयपीएस अधिकारी असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करत राज्य सरकारची गोपनीय माहिती लिक केल्याचा आरोप करण्यात आले होेते.

परमबीर सिंग यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील दुसऱ्या मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत शुक्ला यांनी आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शुक्ला या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो काळजी घ्या; गेल्या 24 तासातील रूग्णांच्या आकडेवारीने टेंशन वाढवलं 

मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला मोठा निर्णय! 

“उद्या ओबीसींचं आरक्षण गेलं तर ठाकरे सरकारला जबाबदार धरू नका” 

तब्बल 9 वर्षांनंतर श्रीसंतला विकेट मिळाली, मैदानावर केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ 

रशियामुळे भारत-अमेरिकेचं बिनसलं?; बायडन यांची नाव न घेता भारतावर टीका