मुंबई | मुंबईत गेल्या 4 महिन्याचा रेकॉर्ड मोडत शहरात हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मागील 24 तासांत 961 रुग्ण सापडले आहेत. तर कोरोना महामारीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 374 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
चार दिवसांपूर्वी मुंबईत 700 पेक्षा अधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही रूग्ण ऑक्सिजनवर आहेत
रविवारी मुंबईत 961 कोरोना रुग्ण आढळले त्यातील 917 रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं दिसली नव्हती. 95 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत. तर 44 रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
मुंबईत शनिवारी एकूण 8 हजार 778 कोरोना चाचणी केल्या होत्या. त्यासोबत एकूण चाचणी 1 कोटी 71 लाख 83 हजार 951 इतकी झाली आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona Virus) डोकं वर काढलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही”
शाळा पुन्हा बंद होणार का?; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती
“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”