नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यासह पंजाब (Punjab), गोवा (Goa), उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा फैसला काही तासातच होणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.
पंजाबमध्ये आपने मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आपचे उमेदवार 60 जागांवर आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पिछाडीवर गेले असून, काँग्रेसचे उमेदवार 38 जागांवर आघाडीवर आहेत.
117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते.
पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.
महत्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी; लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टर म्हणतात…
“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं”
गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल