नवी दिल्ली | इंडिअन प्रिमिअर लीगचा सध्या 13वा सिझन चालू आहे. यामुळे सध्या सर्वत्र फक्त आयपीएलचीच चर्चा चालू आहे. आयपीएलच्या या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सची टीम खूप उत्तम खेळी खेळत आहे. त्यामुळे यावर्षी दिल्लीच्या संघावर सर्वांचंच लक्ष लागून आहे. अशातच आता आयपीएल स्पर्धेच्या मध्यातच संघानं आपली जर्सी बदलल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगाल यांच्यामध्ये 18वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीची टीम आपल्या नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरली होती. हा सामना दुबईमध्ये खेळला गेला होता. दिल्ली कॅपिटल्सचे सीए धीरज मल्होत्रा यांनी या जर्सीची माहिती दिली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये JSWने भारतीय खेळांना पुढे नेण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे. आमची टीम आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यात ही JSW पेंट्सची जर्सी गर्वाने घालेल. फक्त JSW ग्रुपचं भारतीय खेळात मोलाचा वाटा आहे म्हणून नाही तर एकतेचा संदेश देण्यासाठी देखील आमची टीम ही जर्सी घालेल, असं वक्तव्य धीरज मल्होत्रा यांनी केलं होतं.
दिल्ली कॅपिटल्सच्या या नव्या जर्सीवर पाठीमागच्या बाजूला कोव्हीड योद्ध्यांना सलामी दिली गेली आहे. नवीन जर्सीच्या पाठीमागे ‘थँक यू कोव्हीड वॉरिअर्स’ असं लिहिण्यात आलं आहे.
कोरोना महामारीच्या काळात मोठ्या हिमतीनं काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर्स, आशा सेविका, रुग्णालयातील कर्मचारी, इत्यादी सर्व कोव्हीड योद्ध्यांना ही सलामी देण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सनं सोमवारी आरसीबी विरुध्द झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दिल्लीचा संघ गुणपत्रिकेत पहिल्या स्थानी पोहचला आहे. तर मुंबई इंडिअन्सचा संघ दुसऱ्या स्थानी गेला आहे.
दिल्लीच्या संघानं आठ गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यातले चार सामने दिल्लीनं आपल्या नावावर केले आहेत. आरसीबीच्या संघापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई, केकेआर आणि पंजाब या संघांवर मात केली होती. तर हैद्राबादकडून दिल्लीला पराभव पत्कारावा लागला होता.
दिल्लीच्या संघानं आरसीबीपुढे 197 धावांचं आवाहन ठेवले होतं. आरसीबीच्या संघाकडून कर्णधार विराट कोहलीनं उत्तम खेळी खेळत धावांचा पाठलाग केला. मात्र, आरसीबीच्या संघाला या आवाहानावर मात करता आली नाही आणि दिल्लीच्या संघाने 59 धावांनी मोठा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेता अजय देवगनला मोठा धक्का; घरातील ‘या’ खास व्यक्तीला कायमचं गमावलं!