मुंबई | मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मान्सून आता जवळपास सहा दिवसांनी लांबला आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली ( Heavy Rain) आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून थांबला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषत सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
दक्षिण कोकणात बुधवारपासून तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. यावेळी वाऱ्यांचाही वेग वाढलेला असेल, असा अंदाज आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!
“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…”
“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”
पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान