“रिश्ते में हम आपके बाप लगते है और…”, संजय राऊतांनी दंड थोपटले

मुंबई | शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात रंगलेला वाद आता आणखीनच पेटल्याचं पहायला मिळतंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट चप्पल दाखवत उत्तर दिलं होतं.

तर दुसरीकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मोर्चा संभाळल्याचं पहायला मिळतंय. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली.

अशातच आता संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि भाजपवर निशाणा साधलाय. जे कुणी हे किरीट सोमय्या आहेत, त्यांचं गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण मी तुम्हाला देतोय, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

त्यांच्या मुलाच्या नावावर 260 कोटींचा प्रकल्प सुरू आहे. त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या त्या प्रकल्पावर संचालक आहेत. त्यांच्याकडे हे कोट्यावधी रूपये येतात कुठून, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

हे महाराष्ट्र सरकार आहे. तुमचं असेल केंद्रात सरकार, पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे आणि आमच्या हातात देखील बरंच काही आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स काहीही मागे लावा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कितीही धमक्या दिल्या तरी हम आपके बाप लगते है, असं रोखठोक इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिलाय.

बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल, असं म्हणत त्यांनी भाजपला कडक शब्दात सुनावलं आहे. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल, तर तुम्ही ही लढाई पुढे न्याल, असं म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या –

ना हफ्ता ना चिंता! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत एका क्लिकवर मिळणार बिनव्याजी कर्ज

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!