Top news

बाहुबलीच्या स्टाईलमध्ये म्हशीला उचलायला गेला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- Instagram/ kaint_soch4

मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी डान्सचे व्हिडीओ असतात, तर कधी गाणं म्हणतानाचे असतात. काही व्हिडीओ तर खूपच भयानक, तर काही खूपच मजेशीर असतात.

जेव्हापासून कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढायला लागला आहे. तेव्हापासून अनेकांनी आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचा ध्यास घेतला आहे. यामध्ये कित्येकजण असे आहेत की, त्यांना फक्त आपलं शरिर बलवान करायचं असतं. जरी शरिराला पोषण घटक मिळाले नाही तरी चालेल. परंतू बाहेरून शरिर मात्र धष्ट पुष्टच दिसलं पाहिजे.

तसेच आपण याआधी ताकद प्रदर्शनाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये काहीजण खूप मोठ्या वजनाचे एखादी वस्तू उचलून दाखवत असतात. अशातच याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण आपलं शक्तीप्रदर्शन दाखवत आहे. यामध्ये तरूणाने दुसर-तिसर नाहीतर चक्क एका म्हशीला उचण्याचा प्रयत्न केला आहे. बाहुबली या चित्रपटामध्ये त्यामधील मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रभासने ज्याप्रमाणे शिव शंकराची पंड आपल्या दोन्ही हातांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती.

त्याचप्रमाणे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरूणानेही म्हशीला उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं आहे. तरूण सुरूवातीला आपली बॉडी दाखवतो. त्यानंतर जवळच एका खुट्टीला बांधलेल्या म्हशीला आपल्या दोन्ही हातांनी धरतो आणि उचलण्याचा प्रयत्न करतो.

तरूण त्याची सगळी ताकद लावून त्या म्हशीला उचलण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतू म्हशीचं वजन खूप असल्यामुळे त्या तरूणाची चांगलीच फजिती झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ ‘kaint soch’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक कमेंट्स आल्या आहे. तर काहींनी त्यामध्ये तरूणाची खिल्लीही उडवली आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ 18 हजार लोकांनी लाईक केलं असल्याचं समजतं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेअरही केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

सात फेरे घेताना नवरीच्या लेहंग्याला लागली आग अन्…, पाहा व्हिडीओ

लाईव्ह मॅचमध्ये अचानक दोन वर्षाचा चिमुकला शिरला मैदानात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ