नवी दिल्ली | कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचे लग्नाचे बार उडाले आहेत. आज लग्न म्हटलं की, एखाद्या सणासारखाच वाटतं. आजकालच्या लग्नांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायाला मिळतात. ज्या पूर्वी नव्हत्या आणि त्यातील काही असायच्या परंतू तेव्हाची आणि आत्तामध्ये खूप फरक झाला आहे.
लग्न म्हटलं नाच-गाण हे आलंच. याशिवाय व्हिडीओ, फोटो काढणंही आलंच. हल्ली सगळे लग्नातले फोटो सोशल मीडियावरच जास्त टाकतात. काहीजण इंस्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर त्या फोटोंचे आणि व्हिडीओचे मिळून रिल्सही बनवतात.
काहीजण तर हद्द करतात. लग्नाआधीच प्रिवेडिंग शूट करतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढतात. त्याचबरोबर एखाद्या चित्रपटामध्ये ज्याप्रकारे गाणं असतं. अगदी सेम त्याचसारखं गाणही बनवतात. आधीच्या लग्नांमध्ये एक वेगळीच मज्जा असायची. परंतू आता तसं राहिलेलं नाही.
आधी लग्नामध्ये नवरीचे बहिण-भाऊ नवरदेवाचे बूट पळवायचे बूट परत करायलाही त्या बदल्यात काहीतरी मागायचे. मग त्यानंतरच ती बूट नवरदेवाला परत दिली जायची. अशा अनेक गमती-जमती लग्नात होत होत्या. मात्र आता काही वेगळच घडताना दिसतं.
याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नातला असल्याचं समजतं आहे. यामध्ये चक्क घरच्यांनी नवरदेवाकडे एक अजबच मागणी केली आहे. ती ऐकून तुम्हीही चकीतच व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओध्ये नवरा-नवरी एकमेंकांना हार घालत आहे. ते घालत असताना त्यांच्या अवतीभोवती म्हणजेच त्या लग्न मंडपात असलेली वऱ्हाडी मंडळी त्यांना टाळ्या वाजवून चेअरप करत आहेत. एकमेकांना हार घालून झाल्यानंतर. त्याठिकाणी असलेल्या काही व्यक्तींनी त्या नवरदेवाला चक्क नवरीचा किस घ्यायला सांगितला.
हे ऐकून त्या नवरदेवाला थोड लाजल्यासारखं झालं. मात्र तरीही त्या मंडपातील लोक त्याला खूप आग्रह करत होती. त्यांच्या आग्रहा खातिर त्या नवरदेवाने सर्वांच्या समोर नवरीला किस केलं. हे पाहून सगळ्यांनी मोठा आवाज करत त्यांना लग्नांच्या शुभेच्छा दिल्या. तर काहीजण टाळ्या वाजत असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘witty wedding’ या यूजरने आपल्या इंस्टग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 2 हजार लोकांनी लाईक केलं असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्सही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पिसाळलेल्या बैलाने मैैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे घेतली धाव अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
बाहुबलीच्या स्टाईलमध्ये म्हशीला उचलायला गेला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
सात फेरे घेताना नवरीच्या लेहंग्याला लागली आग अन्…, पाहा व्हिडीओ
लाईव्ह मॅचमध्ये अचानक दोन वर्षाचा चिमुकला शिरला मैदानात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ