नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून जगभरात सगळीकडे कोरोना संसर्ग रोगाने नको-नकोस केलंं आहे. कोरोनासारख्या विषाणूला सामोर जाण्यासाठी केंद्र सरकारने सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार अनेक लोकांनी आपल्या लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.
आजकाल कशाचा ट्रेंड निघेल ते सांगता येत नाही. आतातर जो कोणी वॅक्सिन घेतो, तो त्याचा फोटो सोशल मीडियावर फोटो टाकतो. काहीजण तर हद्दच करतात नर्स हातावर इंजेक्शन देत असतात, तेव्हाच दुसऱ्याला फोटो घ्यायला लावतात आणि तो फोटो शेअर करतात.
अशातच याच संदर्भात सोशल मीडियावर एक फोटो खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका व्यक्तीने चक्क आपल्या टी-शर्टवरच वॅक्सिनेशन सर्टिफिकेट शापलं आहे. हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे. की या व्यक्तीने असं सर्टिफिकेट का छापलं आहे. यामागच कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील कोरोना रूग्णांचा आकडा खूपच वाढला होता. पंरतू आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुुळे महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यामध्ये कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारने विमान प्रवास आणि लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
परंतू ज्या नागरिकांचे कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. त्यांनाच प्रवास करता येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे लोकल, विमान प्रवास करण्याअगोदर प्रवाशांना दोन्ही डोस घेतल्याचाही पुरावा दाखवावा लागणार आहे.
त्यामुळे व्हायरल होत असलेल्या फोटोमधील व्यक्तीने याच कारणासाठी आपल्या टी-शर्टवर वॅक्सिनेशन सर्टिफिकेट छापून घेतलं असल्याचं बोललं जात आहे. हा फोटो अतुल खात्री यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.
फोटो शेअर करताना त्यांनी पुन्हा सगळी कामं, विमान, लोकल प्रवास सुरू झाला आहे. सारखं-सारखं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवून कंटाळा आला असल्यानं. या व्यक्तीने ही कल्पना सुचवली आहे, असं कॅप्शनही अतुल खत्री यांनी दिलं आहे. हा फोटो आतापर्यंत जवळजवळ 10 हजार लोकांनी लाईक केला असून हा फोटो खूप जणांनी शेअरही केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
लग्न मंडपातच घरच्यांनी नवरदेवाला घ्यायला लावला नवरीचा ‘किस’, पाहा व्हिडीओ
पिसाळलेल्या बैलाने मैैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे घेतली धाव अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
बाहुबलीच्या स्टाईलमध्ये म्हशीला उचलायला गेला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
सात फेरे घेताना नवरीच्या लेहंग्याला लागली आग अन्…, पाहा व्हिडीओ
लाईव्ह मॅचमध्ये अचानक दोन वर्षाचा चिमुकला शिरला मैदानात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ