गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही

मुंबई | गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मात्र १० राज्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात या राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.

अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगर हवेली, गोवा, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, ओडिशा, मिझोराम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. दीव-दमण, सिक्किम, नागालँड, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश व राज्ये आत्तापर्यंत करोनामुक्त राहिलेली आहेत.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून ती प्रतिदिन ९५ हजार झाली आहे. दिल्लीसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलीय.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. मागील २४ तासांत तब्बल ४ हजार १२३ नवे करोना रुग्ण देशभरात आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील करोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार १५२ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-युवक काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

-कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका- राहुल गांधी

-काँग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते- एकनाथ खडसे

-“चुकीची माहिती दिली म्हणून मंत्री अनिल परब यांना अटक होणार का?”