मुंबई | कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) सावटातच जगभरात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. एकामागोमाग एक कोरोनाचे नवीन प्रकार येत असल्याने ही महामारी संपणार कधी? असाच प्रश्न जगभरातील सर्वांना पडला आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात दावा केला आहे, की भारतात कोविड-19 महामारीची तिसरी लाट 3 फेब्रुवारीपर्यंत शिगेला पोहोचू शकते. हा अंदाज या गृहितकावर आधारित आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमायक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे.
फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शिगेला पोहोचेल आणि त्या काळात दररोज रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचू शकेल (Third Wave of Coronavirus), अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांना साथीच्या रोगाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेवर प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की किती लोकांना लसीकरण केलं गेलं आहे यावर ते अवलंबून आहे.
सध्याच्या काळात लसीकरण हा संसर्ग टाळण्यासाठी सर्वात खात्रीचा मार्ग आहे. मात्र, यासोबतच त्यांनी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यावरही भर दिला, असंही त्यांनी सांगितलं आहे.
15 डिसेंबरच्या आसपास दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 6000 होती, मात्र आता अचानक संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.
परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केलं आहे की कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे सर्वांनी तयार राहणं आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढलं”; द डर्टी पिक्चरबाबत विद्या बालनचा खुलासा
“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”