“मला 24 तासांपैकी 2 तास उचक्या लागतात, माझं एवढं नाव घेतलं जातं”

बी़ड | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते आक्रमक होताना दिसत आहे.

गोपीनाथ गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर काल भाऊबिजेच्या दिवशी परळीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भाऊबिजेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

भाजपने 5 वर्ष सत्ता भोगली मात्र, भाजपला या पाच वर्षात पाहिजे तशी कामं करता आली नाहीत, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे. भाजप पाच वर्ष सत्तेत होती मात्र परळी ते अंबाजोगाई रस्त्याचं काम त्यांना करता आलं नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

भाजपला परळी ते अंबाजोगाई रस्त्याचं काम पाच वर्षात करता आलं नाही. मात्र आम्ही हे काम दीड वर्षात पुर्ण केलं. त्यामुळे ते काम विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचं देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

याच कारणामुळे विरोधक उलटसुलट आरोप करत आहेत. आपल्या मातीतल्या माणसांची काळजी लागते, असा टोला देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

आपणं काम केलीत त्यामुळेच मला 24 तासापैकी 2 तास उचक्या लागतात. एवढं माझं नाव घेतलं जातं. सध्या मी मोठ्या टीकेचा धनी झालो आहे, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दिवसातून 4 तास उचक्या लागल्या तरी मी घाबरणार नाही. मी ध्येय वेडा माणूस आहे. परळीत मोठ मोठे उद्योग आणले पाहिजेत, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले आहेत.

परळीकडे असंख्य लोकांच्या वाटा वळवल्या पाहिजेत, अशी परळी निर्माण करण्याचं माझं स्वप्न पाहिल्याचं देखील धनंजय मुंडेंनी यावेळी बोलून दाखवलं. मी परळीचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे. तुम्ही जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा, असंही आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, काहीजण माझ्याकडे दोन वर्षाचा हिशोब मागत आहे, मी त्यांना हिशोब देणारच आहे, असं म्हणत त्यांनी मुंडे भगिनींना देखील टोला लगावला आहे

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून अनिल देशमुखांची ईडीच्या कोठडीत रवानगी; आलं ‘हे’ कारण समोर

“…आता सामाजिक मंत्र्याचं सामाजिक भान हरवलंय”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी एम्सच्या डाॅक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाले…

  मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका

आर्यन खानला क्रुझवर कोणी नेलं?; नवाब मलिकांनी सांगितली ‘ती’ दोन नावं