Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

…अशा प्रकारे भाजपचे आमदार फुटणार; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ फॉर्म्युला

जळगाव | अलीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकेमकांना टार्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. दोन्ही बाजूचे नेते सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जे नेते राष्ट्रवादीला राम राम ठोकत इतर पक्षात गेले आहेत. अशा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना दिलासा देण्यासारखं सूत्र राष्ट्रवादीने मांडलं आहे. या गोष्टीबद्दल अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणूकीपुर्वी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक नेत्यांची संख्या जास्त आहे. यापुर्वी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या फॉर्म्युल्याचा लिटमस टेस्ट एकनाथ खडसे यांच्या जिल्ह्यातून सुरू होईल, अशी शक्यता आहे. फॉर्म्युल्यानूसार भारतीय जनता पार्टीतील जे आमदार राजीनामा देवून राष्ट्रवादीमध्ये येण्यास तयार आहेत त्यांना राष्ट्रवादीतर्फे महाविकास आघाडीची उमेदवारी देवून पुन्हा निवडून आणू, अशी माहिती राज्याचे अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान,  येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. मुंबईत एका वृत्त माध्यमाशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहेत. भाजपचे हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा अधिक सदस्य नाराज आहेत. उबग आलेली आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे.

याबद्दल लवकरंच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीत येत्या काळात लवकरंच मेगा भरती होण्याची शक्यता आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकरणात एकंच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या आणि चमचा…”

ईशाने बाथरूम मधून शेअर केला ‘तो’ पर्सनल फोटो, सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा फोटो

मोठी बातमी! गिरीश महाजन यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल, धमकी देत चाकूने…

धक्कादायक! ‘त्या’ प्रकरणी करण जोहर अडकला, एनसीबीकडून समन्स

सुपरस्टार सलमान यावर्षी नाही सेलिब्रेट करणार त्याचा वाढदिवस, वाचा काय आहे यामागे कारण?