निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के; आता ‘इतक्या’ आमदारांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली | देशातील बहूचर्चित पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी आयोगानं तयारी चालू केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  झाल्यानंतर राजकीय पक्षांची पळापळ चालू झाली आहे.

गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब, या पाच राज्यातील 690 जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. परिणामी पक्षांतर आणि प्रक्षप्रवेश सुरू झाला आहे.

पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आहे. तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. भाजपच्या चार राज्यातील सत्तेला हादरा देण्याचा प्रयत्न आता विरोधकांकडून होत आहे.

उत्तर प्रदेशात तब्बल 403  विधानसभेच्या जागा आहेत. परिणामी देशाच्या राजकारणाची दिशा उत्तर प्रदेशच्या निकालावरून ठरत असते. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपची निर्वीवाद सत्ता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करत असताना आता भाजपला पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. पक्षाला गळती लागल्याचं सध्यातरी चित्र उत्तर प्रदेशात आहे.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणारे स्वामी प्रसाद मोर्य यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता त्यांच्यापाठोपाठ आमदारांनी पक्ष सोडण्यास सुरूवात केली आहे.

तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापती, तिलहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रेशनलाल वर्मा आणि बिल्हौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवती सागर या आमदारांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

भाजपमधील नाराज नेते समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. परिणामी भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. स्वामी प्रसाद मोर्य यांच्या राजीनाम्यानं भाजपसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न केलेे जात असताना पक्षाला अडचणीत आणण्याचं काम सध्या आमदार करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

 पर्यटनस्थळांबाबत मोठा निर्णय, फिरायला जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत”