महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात?

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 60वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक माध्यमांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये अजित पवार आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीत आहेत. मात्र, गाडीचं स्टिअरिंग अजित पवार यांच्या हातामध्ये आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा फोटो खूप काही सांगणारा आहे.

उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामनाला मुलाखत दिली होती. यावेळी मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमचं सरकार हे तीन चाकी आहे. तीन पक्ष एकत्र येऊन हे सरकार चालवत आहेत. या तीन चाकी सरकारचं स्टिअरिंग मात्र माझ्याच हातात आहे.

मात्र, अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जो फोटो ट्विट केला त्यामध्ये स्टिअरिंग अजित पवारांच्या हातामध्ये आहे. या आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे स्टिअरिंग नक्की कोणाच्या हातात आहे ? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं; लॉकडाऊन उठल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

कोरोनाला संपवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितला अध्यात्मिक उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या वस्तूंच्या किंमती ऐकाल तर थक्क व्हाल!

अंगात येतं म्हणून मायलेकाला अघोरी बाबाकडं नेलं; त्यानं जे केलं ते धक्कादायक

सापाचं तो़ंड धरुन जबरदस्ती दुधात बुडवलं, त्यानंतर असा अंगाशी आला ‘हा’ प्रकार!