…अन् त्यांच्या सन्मानासाठी खुद्द राष्ट्रपती मंचावरून उतरले

नवी दिल्ली | राष्ट्रपती हे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च पद आहे. या पदावर बसलेली व्यक्ती आपल्या कर्तुत्वानं या पदाचा मान वाढवत असते. आताही आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या एका कृतीनं देशवासियांची मनं जिंकली आहेत.

देशाच्या प्रतिष्ठित नागरी पुरस्कारांचं नुकतंच राष्ट्रपती भवनात वितरण करण्यात आलं आहे. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

पद्मश्री, पद्मविभुषण, पद्मभुषण या तीन पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं आहे. या पुरस्कारांची निवड विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीकडून करण्यात येते.

नागरी पुरस्कार वितरण सोहळ्यात ऑलंम्पिक आणि पॅराऑलंम्पिक गाजवणाऱ्या खेळाडूंचा सुद्धा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी खेळाडूंच्या खेळाचा सन्मान म्हणून त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

पुरस्कार वितरणादरम्यान पॅरा खेळाडू के.वाय. व्यंकटेश यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या पुरस्कारासाठी जेव्हा व्यंकटेश व्यासपीठावर आले तेव्हा राष्ट्रपतींनी प्रोटोकाॅल तोडून खाली उतरत त्यांना हा पुरस्कार दिला.

रामनाथ कोविंद यांनी दाखवलेल्या आपुलकीचं सध्या जोरदार कौतुक होतं आहे. परिणामी देशाच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीला सुद्धा खेळाडूच्या खेळाची आणि यशाची जाण असते हे सिद्ध झालं आहे.

के.वाय व्यंकटेश हे पॅरा अॅथलीट आहेत. देशासाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन त्यांनी केलं आहे. व्यंकटेश यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1994 मध्ये केली होती.

2009 मध्ये पाचव्या पॅराऑलंम्पिकमध्ये व्यंकटेश यांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. खेळाच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

व्यंकटेश यांची उंची कमी असल्यानं त्यांना पॅरा अॅथलीटमध्ये खेळण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची उंची 4 फुट 2 इंच आहे. त्यांचा देशातील मानाच्या पुरस्कारानं गौरव झाल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. आपल्या क्षेत्रातील योगदानासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात आलं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या  

  “हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल”

‘बिग बाॅस 15’: अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर