कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!

मुंबई | कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनाचा कहर लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं जात आहे. लसीकरणामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी कोरोनची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते असं म्हटलं जात आहे.

कोरोना काळात लहान मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून पालक मुलांच्या आहारात अनेक पौष्टिक गोष्टींचा सामावेश करताना पाहायला मिळत आहे.

कोरोना काळात लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी –

1. कोरोना काळात मुलांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे. मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात वरण आणि सोयाबीन हे प्रथिनांचे स्रोत समाविष्ठ करणं गरजेचं आहे.

2.प्रतिकारशक्ती सक्षम असेल तर कोणत्याही प्रकारच्या आजाराची लागण होत नाही, वाढ चांगली होते आणि निरोगी आयुष्याकडे त्याची वाटचाल सुरू होते.

3. शरीरात व्हिटॅमिन ई अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट म्‍हणून कार्य करते आणि रोगप्रतिकारशक्‍तीला साह्य करू शकते. तसेच फोर्टिफाईड सेरेअल्‍स, सुर्यफूल बिया, बदाम, तेल, हेझल नट्स व पीनट बटरसह मुलाच्‍या आहारामध्‍ये जीवनसत्त्व ई ची भर केल्‍यास रोगप्रतिकार शक्‍ती वाढण्‍याला मदत होईल.

4. व्हिटॅमिन सी साठी लिंबू-पाणी द्या आणि फळं खाऊ घाला. जे व्हिटॅमिनचे स्रोत आहेत ते मुलांना द्यायला हवेत. कोणत्याही आजारापासून रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर ते भर देतात.

5. व्हिटॅमिन सी साठी लिंबू-पाणी द्या आणि फळं खाऊ घाला. जे व्हिटॅमिनचे स्रोत आहेत ते मुलांना द्यायला हवेत. कोणत्याही आजारापासून रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर ते भर देतात. याशिवाय मुलांना दूध पिण्याची आणि पनीर खाण्याची सवय लावा.

कोरोनाच्या महामारीमध्ये स्वतःचं रक्षण करण गरजेचं बनलं आहे. या विषाणूमुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होत असून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या –

खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!

कोरोनाच्या भीतीनं चक्क माकडानंही लावला मास्क, पाहा व्हिडीओ!

आता अलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज

बाॅयकाॅटनंतर पुन्हा एकदा राधिकाचा बोल्ड लूक; सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उलटी उडी मारली अन्…; पाहा व्हिडीओ