मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्यासोबतच सरकार लसीकरणावर भर देत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव कमी झालेला दिसतोय. पण तरीही सरकारनं काही क्षेत्रांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत.
राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 27 हजार 971 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 50 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जानेवारीच्या सुरूवातीपासूनच राज्यातील रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पहायला मिळालं आहे. आता नवी रुग्णसंख्या 30 काही हजारांवर गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.
गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी वाढल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 1,411 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थितीवर सरकारकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हटके सायकलची जोरदार चर्चा, निवडणुकीआधी 6 फुटी सायकल ठरतीये सेल्फी पाॅईंट
क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटा सामना, त्यादिवशी झालं असं की…
ना रश्मिका ना प्रिया! नव्या ‘नॅशनल क्रश’ची सोशल मीडियावर एकच चर्चा
“त्यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला”, अंनिस वादाच्या भोवऱ्यात; अविनाश पाटील यांचे गंभीर आरोप