वायू प्रदूषणामुळे वाढतोय कोरोना; ‘या’ व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका

नवी दिल्ली | दरवर्षी ऐन दिवाळीत दिल्लीवासियांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. विविध कारणामुळे दिल्लीत दरवर्षी एअर क्वालिटी इंडेक्स उच्च पातळीवर जातो. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागतो.

पंजाब हरियाणामध्ये पीक काढल्यानंतर उरलेलं तणीस जाळल्यानंतर त्याच्या धूराचा सामना दिल्लीतील लोकांना करावा लागतो. तर दिवाळीत फटाक्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाल्याचं दिसून येतं.

दिल्लीतील वायू प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर झालेला पहायला मिळतो. तर वृद्ध लोकांना तर रूग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशातच आता वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वायू प्रदूषणामुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार उद्भवतात. ज्या लोकांना आधीपासून फुफ्फुसाचा किंवा दम्याचा आजार आहे, अशा लोकांना वायू प्रदूषणामुळे अधिक त्रास जाणवतो, असं एम्सचे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

आपण राहत असलेल्या शहरात प्रदुषण वाढलं तर कोरोना रूग्णसंख्या वाढू शकते. प्रदूषण आणि कोरोना फुफ्फुसावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असल्याचं देखील डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

शहरात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर असेल तर त्याचा कोरोना रूग्णांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि कोरोना अधिक धोकादायक बनतो. त्यात कोरोना रूग्णांचा मृत्यू देखील होऊ शकतो, असं डाॅ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हलक्या स्वरूपात वारे वाहत असतात. त्यावेळी फटाक्यातून निघणारा धुर जमिनीच्या पातळीवर राहतो, त्यामुळे प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका दिल्लीत दिसून येतोय, असंही डाॅ. गुलेरिया म्हणाले आहेत.

ज्या रूग्णांना ह्रदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या आहेत तसेच ज्या रूग्णांना फुफ्फुसाच्या समस्या आणि दमा आहे, या लोकांना कोरोनाचा धोका अधिक वाढतो, असंही डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

शहरात प्रदूषण वाढतं त्यावेळी कोरोना जास्तवेळ हवेत राहतो आणि नंतर हा हवेतून पसरणारा आजार होऊ शकतो, असं एक डेटा सांगितो.  तर प्रदुषण वाढलं तर फुफ्फुसाचे आजार वाढतात आणि प्रदुषणामुळे कोरोनाबाधित व्यक्तीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात असं दुसरा डेटा सांगतो, असंही  डाॅ. रणदीप गुलेरिया म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीनंतर दिल्लीत कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळी दिल्ली सरकारने विविध उपाययोजना देखील राबवल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला संपवण्यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचून हल्ला केला”

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा”