हैदराबाद | आज सुरु होणाऱ्या टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये हैद्राबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या टी- 20 सामन्यावर साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. आगामी टी-20 विश्र्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेकडे बघितलं जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2016 साली झालेल्या टी- 20 विश्र्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून त्यांनी विजेते पदावर नाव कोरलं होते.
आयसीसीच्या टी- 20 क्रमवारीत भारत पाचव्या स्थानी आहे, तर विंडीज दहाव्या स्थानी आहे. ही मालिका भारतात होत असल्यानं भारतीय संघाला फायदा होईल. परंतु विंडीज जवळ पोलार्ड, नरेन यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत जे भारतीय खेळपट्टीशी परिचीत आहेत. त्यामुळे विंडीजची सारी मदार या खेळाडूंवर टिकून आहे.
मोहम्मद शमी, रवींद्र जडेचा यांचे टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. तसेच कुलदीप यादव-युझवेंद्र चहल ह्या जोडीवर गोलंदाजीची भिस्त आहे. तर संजू सॅमसन, लोकेश राहूल, श्रेयश अय्यर यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल.
महत्वाच्या बातम्या –
‘ठाकरे’ सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका! – https://t.co/I6s2dAUhVn @Dev_Fadnavis @uddhavthackeray @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
हैदराबाद पोलिसांकडून उत्तरप्रदेश पोलिसांनी शिकायला हवं- मायावती https://t.co/cow5EqjPPa @Mayawati
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं एक आई म्हणून मी समर्थन करते- चित्रा वाघ https://t.co/6tn5ENREn7 @ChitraKWagh
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019