बीसीसीआय घेणार विराट कोहली आणि रवी शास्त्रींची शाळा; विचारणार जाब

मुंबई |  वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. तसाच तो क्रिकेट प्रशासनाच्यासुद्धा जिव्हारी लागला आहे. BCCI ची प्रशासकिय समिती कर्णधार विराट कोहली आणि प्रक्षिक्षक रवी शास्त्री यांची शाळा घेऊन त्यांना जाब विचारणार आहे.

BCCI चे प्रशासकिय समितीचे सदस्य आणि विराट-रवी शास्त्री यांची एक बैठक होणार आहे. भारतीय संघ विदेशातून परतल्यानंतर ही बैठक होणार आहे.

भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीने न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करणे भारताला जमले नाही. भारतीय संघ विश्वचषकात पहिल्यांदाच ऑलआऊट झाला. यानंतर प्रसारमाध्यमांनी आणि सोशल मीडिय़ावर लोकांनी भारताची संघनिवड चुकली, असं म्हणत विराट अन् रवी शास्त्री यांबद्दल रोष व्यक्त केला. यावरच BCCI शाळा घेणार आहे.

स्पर्धेच्या अतिशय महत्वाच्या सामन्यात भारतीय फलंजादांनी चुका केल्या. त्यांच्या उणीवा स्पष्टपणे दिसत होत्या. खेळाडू बेजबाबदारपणे चुकीचे फटके खेळून आऊट होत होते. यावर BCCI प्रशासन नाराज असल्याचं कळतंय.

दिलीप वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाची निवड चुकली, असं म्हणत एम.एस. के प्रसाद यांच्या निवड समितीला धारेवर धरलं आहे. संघाची निवड करताना कसलाही विचार केला गेला नाही, असं माझं मत आहे. संघ निवडताना अक्कल काय गहाण ठेवली होती का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भारतीय संघ जरी विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी बीसीसीआयने खेळाडूंवर बक्षिसांची खैरात केली आहे.