खेळ

भारताने शेवटपर्यंत केलेल्या संघर्षाला शोेएब अख्तरने केला सलाम; म्हणतो…

मॅन्चेस्टर |  विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. अन् करोडो फॅन्सचा हिरमोड झाला. पाकिस्तानचा माजी खेळाडू रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर याने देखील भारताच्या पराभवावर भाष्य केलं आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांच्या संघर्षपूर्ण खेळीचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. त्यांनी भारताला जवळपास विजय मिळवून दिला होता. वर्ल्डकपचा हा सगळ्यात धक्कादायक निकाल होता. अंतिम फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाकडून महत्वाच्या क्षणी निर्णयाक खेळी झाली नाही, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने व्यक्त केली आहे.

झीलंडने कालच्या पावसाच्या व्यत्य़यानंतर दुसऱ्या दिवशी दिलेलं 240 धावांचं आव्हान भारत पार करू शकला नाही. टॉप ऑर्डरची उडालेली घसरगुंडी, मधल्या फळीतल्या फलंदाजांची खराब कामगिरी यामुळे भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं. याबरोबरच भारताचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अन् त्यामुळेच करोडो भारतीयांची मनं तुटलीयेत!

भारत सामना हरतोय अशी परिस्थिती आल्यानंतर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आणि सर रविंद्र जाडेजा यांनी भारताच्या डावात जान भरली. आणि भारताला बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं. जाडेजाने वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याला धोनीने उत्तम साथ दिली. परंतू धावगती वाढवण्याच्या नादात जाडेगा बाद झाला अन् त्यानंतर धोनीला मार्टिन गप्टीलच्या अचूक फेकीवर धावबाद व्हावे लागले अन् तिथेच करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

IMPIMP