आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला प्रारंभ; भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला सुरूवात झाली आहे. आहे. कसोटीमध्ये रोहित शर्मा पुन्हा स्थिरावण्याची संधी तो कशी साधतो, याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले आहे. याचप्रमाणे यष्टीरक्षक-फलंदाजाच्या स्थानासाठी झगडणाऱ्या ऋषभ पंतला वगळून अनुभवी वृद्धिमान साहाला अजमावण्याचा प्रयोग केला आहे.

मायदेशातील भारताच्या पहिल्या कसोटीसाठी कर्णधार विराट कोहलीने संघाची घोषणा करताना दिल्लीकर यष्टिरक्षक-फलंदाज पंतला वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे २२ महिन्यांच्या अंतराने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी साहाला मिळणार आहे. 

सलामीला मयंक अग्रवालने आपले स्थान जवळजवल निश्चित केले आहे. मधल्या फळीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमी विहारी आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेगवान माऱ्याची जबाबदारी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्याकडे असणार आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ मागील अठरा महिन्यांपासून भारताबाहेर खेळत आहे. तेव्हा फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना फलंदाजांना थोडा संघर्ष करावा लागू शकतो, असं कोहलीने म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-