किंग्स्टन : जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विंडीजची 87/7 अशी बिकट अवस्था झाली होती. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीकची नोंद करत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ माघारी धाडला. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे अजुनही 329 धावांची आघाडी आहे, त्यामुळे जमैका कसोटी डावाने जिंकण्याची चांगली संधी विराट कोहलीच्या भारतीय संघाकडे असणार आहे.
दुसऱ्या दिवशी भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. यानंतर जाडेजा-विहारी यांची छोटेखानी भागीदारीही कॉर्नवॉलने तोडली. यानंतर मैदानात आलेल्या इशांत शर्माने हनुमा विहारीची उत्तम साथ देत भारताला मजबूत धावसंख्या उभारुन दिली.
दोन्ही फलंदाजांनी नवव्या विकेटसाठी 112 धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान हनुमा विहारीने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक तर इशांत शर्माने पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. हनुमा विहारीने 111 तर इशांत शर्माने 57 धावांची खेळी केली. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर, भारताचे तळातले फलंंदाज फारसा प्रतिकार करु शकले नाहीत.
विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत, यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली.
मधल्या फळीत शेमरॉन हेटमायरने कर्णधार जेसन होल्डरच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी विंडीजचे फलंदाज फॉलोऑन किती वेळ टाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
गायी तयार करण्यासाठी कारखाना सुरू करणार- गिरिराज सिंह – https://t.co/Nxik7v8N7m @girirajsinghbjp @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
“सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारीसाठी मला भेटल आहेत” – https://t.co/gQNsnwgwO0 @imtiaz_jaleel @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर! – https://t.co/gDcI51AJP0 @Dev_Fadnavis @bb_thorat
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019