निवडकर्त्यांचं काम लोकांना खूश करणं नाही- सौरभ गांगुली

नवी दिल्ली : भारतीय संघ 3 ऑगस्टला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. विराट कोहली हा या दौऱ्यावर कर्णधार असणार आहे. भारतीय संघात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंच्या निवडीवर माजी कर्णधार सौरंभ गांगुलीने प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. 

भारतीय संघातील अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि शुभमन गील या दोघांची वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यासाठी निवड न केल्याने गांगुलीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

निवडकर्त्यांचे मुख्य काम सर्वश्रेष्ठ उपलब्ध संघाची निवड करणं हे आहे. लोकांना खूश करणं हे त्यांचं काम नाही, असं म्हणत सौरभ गांगुलीने निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

निवड समितीने आपल्या निवड प्रक्रियेत सातत्य ठेवायला हवं, असंही गांगुलीचं मत आहे. सौरभ गांगुलीने ट्वीट करुन आपलं मत व्यक्त केलं आहे. 

केदार जाधव हा चांगल्या कामगिरीत आपले सातत्या राखून ठेवू शकला नाही तरीही तो संघात आहे. मात्र वेस्ट इंडिजमध्ये पाच भारत-अ सामन्याच्या मालिकेत 218 धावा करुन मालिकावीर झालेला शुभमन गील संघाबाहेर आहे, याकडे गांगुलीचे लक्ष वेधलं आहे. 

लय आणि आत्मविश्वास कायम राखण्याची वेळ आली आहे. निवडकर्त्यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये समान खेळाडूंची निवड करावी, असं स्पष्ट मत गांगुलीने व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार पण…; प्रकाश आंबेडकरांनी घातली ‘ही’ अट!

-आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणारा विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

-अण्णा हजारेंचा इशारा; मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार!

-चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग

-खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी टाकणार!