चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द; भारत सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. कोरोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावं, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आलं होतं. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किटचा वापर थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, या किट्सचा वापर करु नका, हे किट्स पुन्हा त्या कंपन्यांना परत करा, असं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाशी लढणाऱ्या आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

-पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर लाॅकडाऊन वाढवण्याविषयी अनिल देशमुख म्हणतात…

-“लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात फसतील”

-लॉकडाउन कुठे कडक आणि कुठे शिथिल करणार?; पंतप्रधानांनी केलं स्पष्ट

-किशोरीताई, तुम्ही खरा आदर्श निर्माण केला आहे- धनंजय मुंडे