भारत-चीनच्या सैन्यात चकमक; भारताच्या एका कर्नलसह दोन जवान शहीद

नवी दिल्ली | भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील लडाखमधील गलवान खोऱ्यात ही चकमक झाली.

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांचा मारल्याची घटना घडली आहे.

गलवान खोऱ्यात सैन्य माघारीदरम्यान अचानक संघर्ष उफाळला आणि रात्रीच्या वेळी चकमक झाली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये चीनने केलेल्या गोळीबारात भारताचे एकूण तीन जवान शहीद झाले. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, संपूर्ण जग कोरोनामुळे चीनच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन अशाप्रकारच्या कुरापती करत आहे, असं संरक्षक तज्ज्ञांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“यशराज फिल्म्स आणि सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, चौकशी करा”

-“…तेव्हा हे कलाविश्व अत्यंत क्रूर आणि निर्दयी होत जातं”

-“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

-सामनातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता संजय राऊत म्हणतात…

-…त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, सामनाचा आताचा अर्धवट अग्रलेख; थोरातांची टीका