Top news कोरोना देश

‘या’ राज्यांनमध्ये अजून कोरोनाचा शिरकाव सुध्दा झालेला नाही

मुंबई |  देशासह संपुर्ण जग कोरोनाने त्रस्त असताना सुध्दा काही राज्यांमध्ये कोरोनाचा आत्तापर्यंत शिरकाव सुध्दा झालेला नाही ही कौतुकाची बाब आहे.  देशात कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना एक सकारात्मक गोष्ट देखील समोर आली आहे. देशातल्या काही राज्यांत कोरोनाने अजूनपर्यंत शिरकाव देखील केलेला नाही, अशी सकारात्मक माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

सिक्कीम, नागालँड आणि लक्षव्दीपमध्ये कोरोनाचा अजून एकही रूग्ण आढळलेला नाही. म्हणजे कोरोनाने शिरकावच केलेला नाह. तसंच अंदमान निकोबार, अरूणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर आणि मिझोरम या राज्यांत सध्या कोरोनाचे रूग्ण नाहीयेत, अशी माहिती केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

देशातली एकंदरित स्थिती पाहता आणि WHO ने दिलेल्या इशाऱ्यानंतर देशभरात 4362 कोव्हिड सेंटर तयार करण्यात आली आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये लक्षणं असलेल्या रूग्णांना ठेवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

देशातल्या काही प्रमुख शहरांत कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या शहरांत केंद्रिय पथकाने पाहणी केली असून लवकरच याबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडेला घराबाहेर जाणं महागात पडलं

-मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी

-“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”

-‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”