भारतीय संघानं देशाची मान उंचावली; दक्षिण आफ्रिकेचा 5-0 ने धुव्वा

भुवनेश्वर : तब्बल 43 वर्षांचा हाॅकी वर्ल्ड कपचा वनवास मिटवण्यासाठी रणांगणात उतरलेल्या भारतीय टीमची सुरवात दणक्यात झाली आहे. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 5-0 ने धुव्वा उडवला आहे. भारताकडून खेळताना सिमरनजीत सिंगने दोन गोल केले तर मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग याने प्रत्येकी 1-1 गोल केला. या पहिल्या-वहिल्या विजयाबरोबरच भारतानं ग्रुप सी मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. भारत आणि बेल्जिअमचे प्रत्येकी 3-3 पॅांंईंट्स आहेत. पण चांगल्या गोल सरासरीमुळे भारतीय संघ पहिल्या स्थानी आहे. बेल्जियमनं त्यांच्या पहिल्या मॅच ध्ये कॅनडाला धुळ चारली होती. बेल्जियम ग्रुप सी मध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

कोणत्या खेळाडूंनी गोल केले-

भारतासाठी पहिला गोल मनदीप सिंगने केला. त्याचा गोल पेनल्टी कॅार्नरवरून आला. दुसरा गोल 12 व्या मिनिटाला आकाशदीपने, तिसरा गोल 43 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने, चौथा गोल 45 व्या मिनिटाला ललित उपाध्यायने तर पुन्हा एकदा सिमरनजीत सिंग पाचव्या गोलसाठी धावून आला.

DtJ1i49VsAAuIUf

हॉकी वर्ल्ड कप मधला भारताचा इतिहास

2010 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच भारताने वर्ल्ड कपची पहिली मॅच जिंकली आहे. यापूर्वी 2010 साली भारताने पाकिस्तानचा 4-0 असा लाजिरवाणा पराभव केला होता. मागच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीम नवव्या स्थानावर होती. भारतानं एकमेव हॅाकी वर्ल्ड कप 1975 साली जिंकला होता.

आकाशदीपचा वर्ल्ड कप इतिहास-

 आकाशदीपचा दक्षिणआफ्रिकेविरूध्दचा भारतासाठी हा दुसरा गोल होता.यंदाच्या वर्ल्ड कप मधला आकाशदीपचा हा पहिला गोल तर मागच्या वर्ल्ड कप मध्ये त्याने 5 गोल केले होते.मागच्या वर्ल्ड कप मध्ये आकाशदीप सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता.

DtJ1sueVsAE30VX

उभयतांमध्ये कधी रंगतोय सामना-

 2014 साली पहिल्याच मॅच मध्ये भारताला पराभव स्विकारावा लागला होता. बेल्जियमने त्यावेळी भारताला 3-2 अशी धुळ चारली होती. याहीवर्षी भारत आणि बेल्जियम एकाच ग्रुप मघ्ये आहे. भारत आणि बेल्जियम दरम्यान 2 डिसेंबरला मॅच होत आहे; मागचा  इतिहास पाहिला तर भारताला ही लढत नक्कीच आव्हानात्मक असेल तेव्हा कोण बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.