प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतात, “दारू म्हणजे औषध, आयुर्वेदात…”

मुंबई | भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कोरोनावर मात करण्याचे त्यांनी अजब उपाय देखील सांगितले होते.

अशातच आता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अजब वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या पुन्हा चर्चेचा विषय बनल्याचं दिसत आहे.

दारू कमी प्रमाणात घेतल्यास ते औषधासारखे कार्य करतं, असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.

मर्यादित प्रमाणात दारू औषध म्हणून कार्य करतं, पण तीच दारू अमर्यादीत प्रमाणात घेतल्याचं ते विष बनतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दारूचा अतिरेक घेतल्यानं होणारं नुकसान सर्वांनी समजून घ्यावं आणि ते थांबवावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशमध्ये दारूबंदी करण्यात यावी यासाठी सध्या दोन गट निर्माण झाल्याचं दिसत होतं. भाजप नेत्या उमा भारती यांनी दारूबंदी करावी, यासाठी आंदोलन देखील केलं होतं.

तर दुसरीकडे आत मध्य प्रदेश सरकारने दारूवरचे नियम आज बदलले आहेत. त्यावरून राजकारण तापताना दिसतंय. अशातच प्रज्ञा सिंह याच्या वक्तव्याने चांगलाच वाद रंगण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर आव्हाड नाराज म्हणाले, “कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…”

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी