“ट्रम्प खोटं बोलले; काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितलीच नाही”

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मला मदत मागितली. म्हणून मी मध्यस्थीस तयार झालो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. मात्र त्यांचा हा दावा भारताने हा दावा फेटाळला आहे. 

काश्मीर प्रश्नाबाबत भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मदत मागितली नाही, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटल आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट करुन डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्रम्प यांच्याशी काश्मीर प्रश्नाबाबत कोणतंही बोलणं झालं नाही. फक्त द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा झाली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

सर्वांना माहित आहे की, मोदी अशी कोणतीही विनंती करणार नाहीत. ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आणि लाजिरवाणं आहे, असं म्हणत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार ब्रॅड शेरमॅन यांनीही टीका केली आहे.

काश्मीर प्रश्नाबाबत भारतीय कोणत्याही राष्ट्राची मदत स्विकारणार नाही, या निर्णयावर भारत आजही ठाम असल्याचं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आधी कमलनाथांनी आणि आता रेड्डींनी फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न’!; स्थानिकांना 75 टक्के नोकऱ्या

-‘ती’ म्हणते; आदित्य ठाकरे येतील आणि आमचा प्रश्न लगोलग सुटेल… असं आम्हाला वाटलं नव्हतं!

-हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल रिषभ पंत म्हणतो…

-मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी बसवला पुतळा!

-…नाहीतर भाजपचाच काँग्रेस होईल; चंद्रकांत पाटलांचा काळजीचा सूर