भारत-पाक क्रिकेट मालिका होणे शक्य नाही – सुनिल गावसकर

मुंबई | सध्या संपूर्ण जग करोना विषाणूशी लढत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. यावर माजी कर्णधार कपिल देव यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे धुडकावला होता. आता माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी पाकला टोला लगावला आहे.

एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडण्याची शक्यता जास्त आहे, पण सध्या भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्य नाही. ICC च्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ समोरासमोर येत आहेत तितपर्यंत ठीक आहे पण दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका सध्याच्या घडीला शक्य नाही, असं गावसकर यांनी म्हटलं आहे. ते एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

सध्या कोरोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित केल्या गेल्या आहेत तर काही लांबवल्या आहेत.  अशावेळी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दुबईसारख्या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी. यामधून येणारा निधी हा दोन्ही देशांनी समसमान वापरावा असा पर्याय काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने सुचवला होता.

दरम्यान, शोएबच्या या मागणीला रमीझ राजा, शाहिद आफ्रिदी या माजी पाक खेळाडूंनीही पाठींबा दर्शवला. भारतामध्ये मात्र खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची ही मागणी धुडकावून लावली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल”

-“राज्यावरच्या अर्थसंकटाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील”

-पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टला कोरोना; 144 गर्भवती महिला क्वारन्टाईन

-ट्रेनबाबतची अफवा पसरवणाऱ्याची चौकशी होणार- अनिल देशमुख

-“पंतप्रधानांच्या कॉन्फरन्समध्ये आदित्य ठाकरे मोबाईलवर खेळत बसले नसते तर ही वेळ आलीच नसती”