क्रिकेटप्रेमींना भारत- पाकिस्तान सामन्यांमधला थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार!

मुंबई | संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने नागरिक सध्या घरातच आहेत किंबहुना त्यांना घरात बसणं कर्मप्राप्त झालं आहे. अशातच लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी केंद्र सरकारने 90 च्या दशकातली गाजलेली रामायण ही मालिका सुरू केली आहे.  दुसरीकडे क्रिकेटप्रेमींसाठी देखील स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे.

4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळले गेलेले वर्ल्डकपचे सामने पुन्हा एकदा दाखवण्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून या सामन्यांना सुरूवात होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यांमधला थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

कोरोनाचा फटका जगातल्या अनेक खेळांच्या मालिकांना बसला आहे. तसाच तो क्रिकेटच्या सामन्यांना आणि मालिकांना देखील बसला आहे. त्यामुळे क्रिकेट शौनिक नाराज झाले आहेत. मात्र भारत-पाक क्रिकेट सामन्यांचा पुन्हा एकदा थरार पाहायला मिळत असल्याने त्यांच्यासाठी आता आनंदाची गोष्ट असेल.

दरम्यान, भारताने आतापर्यंत वर्ल्डकपच्या सगळ्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली आहे. कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या इतिहासाची पाने चाळायला मिळणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 70 हजार स्थलांतरित कामगारांविषयी घेतला मोठा निर्णय

-जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा, म्हणाली…

-कोरोनावर मात करण्यासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ही सरसावली; दिली 2 कोटी रूपयांची मदत

-मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही कोरोनाग्रस्तांसाठी केली मोठी मदत

-पुण्यात कोरोनाचा पहिला बळी