भारताच्या राजकारणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला ‘हा’ मोठा विक्रम; जाणून घ्या!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. मोदी देशाचे सर्वात दीर्घकाळापर्यंत पदावर राहणारे देशाचे चौथे पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधान मोदींनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले होते.

भारतीय राजकारणात सर्वात प्रदीर्घ काळापर्यंत पंतप्रधान पदी असण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावावर आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 27 मे 1964 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. ते एकूण 16 वर्ष 286 दिवसांपर्यंत पंतप्रधान होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत एकूण 14 पंतप्रधान झाले आहेत.

मोदींनी हा रेकॉर्ड मोडण्यापुर्वी भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर होता. अटल बिहारी वाजपेयी आपला सर्व कार्यकाळ मिळून 2,268 दिवसांपर्यंत पंतप्रधान होते. मोदींनी 13 ऑगस्ट म्हणजे आज गुरूवारी हा रेकॉर्ड मोडला आहे.

दरम्यान, पंडित नेहरुंनंतर इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले. त्यानंतर चौथ्या स्थानी भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. नरेंद्र मोदींच्या नावावर जास्त काळ गुजरातचे  मुख्यमंत्रीपद सांभाळल्याचा विक्रम नावावर आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारताच्या राजकारणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला ‘हा’ मोठा विक्रम; जाणून घ्या!

दारूची दुकान उघडली पण जिम अजूनही बंद हे दुर्दैवी; फडणवीसांचा राज ठाकरेंच्या सूरात सूर

अधिकारी बदल्यांच्या नावाखाली महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची कमाई, सीआयडी चौकशी करा; पाटलांचा गंभीर आरोप

पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, पवारांचीही भेट घेण्याची शक्यता!

संजय दत्तला कर्करोगाचं निदान झाल्यावर पत्नी मान्यताची भावनिक पोस्ट; म्हणाली…