नवी दिल्ली | भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे. फ्रान्सने हे विमान दिल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. फ्रान्समधील ‘दसॉअॅव्हिएशन’ या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे.
एनआयने या संदर्भातले वृत्त दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेल करारावरुन मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी वारंवार निशाणा साधला होता. तसेच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबांनींचा फायदा व्हावा म्हणून मध्यस्थाचे काम केले असाही आरोप केला होता.
राफेल विमानाची किंमत आघाडीच्या काळापेक्षा वाढवण्यात आली, असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला होता.
राफेल करारावरुन सत्ताधारी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. नेमका किती रुपयांचा करार झाला? हे निर्मला सीतारामन का सांगत नाहीत असा प्रश्न राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला होता.
राफेल कराराचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर चांगलाच गाजला होता. आज अखेर फ्रान्सने पहिल्या विमानाची डिलिव्हरी भारताला दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुलवामासारखी घटना घडली नाही तर परिवर्तन नक्की होणार- शरद पवार https://t.co/XAHP9McskO @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
विधानसभेसाठी मनसे आणि आघाडीची छुपी हातमिळवणी? https://t.co/hgmvPbMoIc
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा; खासदार नवनीत राणा यांची मागणीhttps://t.co/RWpOJylbOG @NavneetKRana
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019