चिडका विराट; सामना गमावल्यानंतर पत्रकारावर भडकला!

मुंबई |  न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या मैदानात किवींनी तिसऱ्या दिवशीच भारतीय संघाचा पराभव करत मालिका २-० अशी खिशात घातली. कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाज बॅकफूटवर खेळल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहलीचा देखील किवीच्या गोलंदाजांसमोर निभाव लागू शकला नाही.

दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवली. संपूर्ण मालिकेतील हा क्षण भारतीय संघाच्या बाजूने कलल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान याचवेळी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार केन विल्यम्सन आणि लॅथम बाद झाल्यानंतर कर्णधार विराटने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या याच व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चाही रंगली. पण विराटला काही न्यूझीलंडच्या भूमीवर विजयाचं भाग्य लाभले नाही.

दुसऱ्या कसोटीतील पराभवासह मालिका 2-0 अशी गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत विराटने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. भारतीय फलंदाजांच्या निराशजनक कामगिरीमुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला, असे त्याने सांगितले. याच वेळी एका पत्रकाराने मैदानातील आक्रमक अंदाजावरुन विराटला बाऊन्सर मारला. यावर विराट चांगलाच भडकला.

मैदानातील माझ्या वर्तनामुळे मॅच रेफ्रिंना कोणतीही अडचण नाही. संपूर्ण माहिती घेऊन प्रश्न विचारत जा! अशा शब्दांत विराटने पत्रकाराच्या बाऊन्सरवर फटकेबाजी केली. विराट कोहली पत्रकार परिषदेत भडकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2018 मध्ये इंग्लंडमध्ये 1-4 अशी मालिका गमावल्यानंतर विराट पत्रकार परिषदेत भडकल्याचं पाहायला मिळालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय; शेलार आणि राष्ट्रवादीमध्ये ट्वीट वॉर

-पोंक्षे, काय डोक्यावर पडलाय काय?; ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड भडकले

-पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय- अमोल मिटकरी

-आशिष शेलारांची राष्ट्रवादीला बेडकाची उपमा; रोहित पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

-छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढणे हे माझं स्वप्न होतं पण…- राज ठाकरे