पराभव झाला अन् विराट कोहली म्हणतो…!

बंगळुरू : टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला 9 विकेट राखून पराभूत केलं. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने रणनिती स्पष्ट केली आहे. तसेच आम्हाला अशीच लढत अपेक्षित होती, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

आम्हाला अशाच प्रकारची लढत अपेक्षित होती. टी-20 वर्ल्डकपपूर्वी आम्हाला अशा प्रकारच्या कठीण लढतींना सामोरं जायचं आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्यापूर्वी प्रथम फलंदाजी करण्याचा ‘पॅटर्न’ आजमावत राहू, असं विराटने सांगितलं.

विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिका संघाचं कौतुकही केलं. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्यांच्या गोलंदाजीला खेळपट्टीची चांगली साथ मिळाली, असं कोहली म्हणाला.

संघ अशा पद्धतीच्या सपाट खेळपट्टीवार प्रथम फलंदाजी करण्यापूर्वी कदापि मागे हटणार नाही. अशा खेळपट्टीवार प्रथम फलंदाजी करून स्वत:ला आजमावत राहू. हा आमच्या रणनितीचा भाग आहे, असं विराटने म्हटलं आहे.

दरम्यान, वर्ल्डकपपूर्वी कोणत्याही परिस्थितीत संघाला आजमावून पाहायचं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणं अपेक्षित असतं. अन्य प्रकारांमध्ये भागीदारीसाठी बराच वेळ मैदानावर खेळावं लागतं. पण इथं तर 40-50 धावांची भागीदारी खूपच फायदेशीर ठरते, असं विराटने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-