खेळ

रोहित-विराटच्या वादाला नवं वळण; विराट पत्रकार परिषद घेणार!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे दोन गट पडले आहेत. अशा चर्चा रंगल्या होत्या. आता या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्डकप 2019 मध्ये भारताच्या पराभवानंतर या वादाला सुरवात झाली. 

3 ऑगस्टला वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाला अमेरिकेला रवाना होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रविवारी उशीरा बीसीसीआयच्या वतीने विराट कोहली पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळात आहे.

सोमवारी संध्याकाळी भारतीय संघ पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा हा भारतीय संघाचा शेवटचा दौरा असू शकतो. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शास्त्रींना 45 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला होता. त्यामुळं ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती मिळत आहे. 

भारतीय संघात कोणतीच गटबाजी नाही. विराट-रोहितमध्ये कोणताच वाद नाही. असं बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-…हे आता थांबायलाच हवं; राज ठाकरेंचं आवाहन

-उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

-“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

-काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

IMPIMP