Top news कोरोना देश

भारत बायोटेकची मोठी घोषणा! आता नाकाद्वारेही मिळणार लस

corona test e1641471934244
Photo Courtesy- Pixabay

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. गेल्या दीड वर्षापासून सर्वजण कोरोनाशी लढत आहेत. अशातच सध्यातरी कोरोनावर उपाय म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय आहे.

लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना संसर्गाला थांबवता येत आहे. सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना वारंवार लसीकरणाचं महत्त्व सांगत आहेत. अशात लस निर्मीती महत्त्वाची आहे.

कोरोना लसीकरणावर सध्या राज्य आणि केंद्र सरकार विशेष भर देत आहेत. सध्या देशात इंजेक्शनद्वारे लस देण्यात येत आहे. पण आता भारत बायोटेकनं नाकाद्वारे लस देण्यासाठी परवानगी मिळवली आहे.

भारत सरकार आणि डीसीजीआयनं या पद्धतीसाठी परवानगी दिली आहे. परिणामी आता इंजेक्शनला घाबरणारे नागरिक नाकाद्वारे लस घेऊ शकणार आहेत.

डीसीजीआयच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने कंपनीच्या इन्ट्रानेझल कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसच्या ट्रायलसाठी प्राथमिक मंजुरी दिली आहे.

भारतातील ही पहिली अशी लस आहे, जी नाकावाटे दिली जाईल. या लशीत ओमिक्रॉनसह कोरोनाच्या इतर व्हेरियंटलाही रोखण्याची क्षमता असल्याचं सांगितलं जातं आहे.

भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. सध्या जगभर कोरोना लसींची अधिक मागणी वाढली आहे. परिणामी आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत, असं इल्ला म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या कोरोना लसींच्या बूस्टर डोसला परवानगी दिली आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना देखील लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना सर्वांना देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

 

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…