भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी ही नावं चर्चेत; कोणाची लागणार वर्णी???

मुंबई : टीम इंडियाचा नवा कोच कोण असेल, या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. भारताला 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती नव्या कोचची निवड करणार आहे. प्रशिक्षकपदासाठी सहा जणांच्या मुलाखती होणार आहेत. पण त्यामध्ये रवी शास्त्री यांची दावेदारी प्रबळ मानली जात असली तरी श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक टॉम मुडी आणि न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची नावं देखील टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रेसमध्ये आहेत.

प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये शास्त्रींसह माइक हेसन, टॉम मूडी लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि फिल सिमंस यांचाही समावेश आहे. सिमंस यांनी अफगाणिस्तानच्या टीमला कोचिंग केलं आहे. तर रॉबिन सिंग यांनी ‘मुंबई इंडियन्स’ला कोचिंग केले आहे. टीम इंडियाचे फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. लालचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखालीच टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 

शास्त्री यांना स्पर्धकही तगडे आहे. फक्त त्यांचा विचार व्हायला हवा. या सगळ्यांचा विचार झाला कदाचित शास्त्रींच्या जागी दुसरा प्रशिक्षक पहायला मिळू शकतो. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची कामगिरी फार उंचावलेली नाही. त्यांचा कार्यकाळ संमिश्र यशाचा आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे.

शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने 21 पैकी 13 कसोटी सामन्यांत भारताचा विजय झाला आहे. टी-20 मध्ये 36 पैकी 25 मध्ये विजय मिळवला आहे. एकदिवसीय सामन्यांत 60 पैकी 43 विजय आहेत.

दरम्यान, रवी शास्त्री कोचपदावर कायम राहिले तर त्यांचा कार्यकाळ 2021 पर्यंत असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ पुरस्कारानं सन्मान

-मी बिकाऊ नाही; भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं पंतप्रधानांना ट्वीट

-अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपती घेणार भेट

-“भाजपचा फक्त जम्मू काश्मीरच्या जमिनीवर डोळा”

-तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला; नाना पाटेकरांची पूरग्रस्तांना मदत